रशिद खानच्या गोलंदाजीमुळे वेस्टइंडिज पराभूत

0

गोस आइलेट। चॅम्पियन ट्रॉफीपेक्षाही रेमांचक झालेला असा अफगाणिस्तान व वेस्टइंडिज याच्यात सामना रंगला. नव्याने उदयास येत असलेल्या अफगाणिस्तान संघाने वेस्टइंडिज सारख्या बलाढ्य संघाला 63 धावांनी पराभूत केले.या सामन्यातील भूमिका निभावली ती गोलंदाज राशिद खान याने,त्याने आपल्या गोलंदाजीच्या जादूने 8.4 षटकात फक्त 18 धावा देवून 7 फलंदाजाना तंबूत परत पाठविले. अफगाणिस्ताने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर जावेद अहमदी याच्या 81 धावा फार महत्वपुर्ण ठरल्या.नाईब अफगाणिस्तान संघाने 6 फलंदाज बाद होवून 212 धावा बनविल्या. मात्र याला प्रतित्तर देण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिज संघाला आपल्या फिरकीच्या जादून गोधळून टाकून राशिद खाने 18 धावा देवून 7 गडी बाद करून अफगाणिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली.तर गुलाबदिना नईब याने 41 धावा केल्या त्यामध्ये 2 षटकार व 3 चौकार लावले.

वेस्टइंडीज 149 धावावर बाद
आफगणास्तिन यांनी दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना वेस्ट इंडिजचे फलंदाज विशेष अशी काही कामगिरी करू शकले नाही.राशिद खान याच्या चेडूपुढे सर्वांनी नंगी टाकून दिलेली दिसून आली.अफगणिस्तान कडून दौलत जद्रान,मोहम्मद नाबी, अमिर हमजा, गुलाबदिन नईब,सामिउल्लाह शेनावरी, राशिद खान यांनी गोलदांजी केली.सलामीवीर पॉवेल ( 21) ,एस.डी होप (35),जे.एल.कार्टर (19), ए.एस.जॉसफ (27 ) धावा केल्या या फलंदाज व्यतिरिक्त कोणाताही फलंदाज हा दोन आकडी धावा करू शकला नाही.वेस्ट इंडिज संघ 44.4 षटकात संपुर्ण संघाला 149 धावावर बाद केले. असा बाद झाला वेस्ट इंडिज संघ — 1-3 धावांवर, 2 -41 धावांवर ,3-68धावांवर,4-68 धावांवर,5-70धावांवर,6-70धावांवर,7-90धावांवर,8-135धावांवर,9-144धावांवर, 10-149 धावांवर सर्व संघ बाद झाला.