रावेर- तालुक्यातील रसलपूर येथे किरकोळ कारणावरून एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी विजय लक्ष्मण महाजन (37, रसलपूर) यांच्या घरासमोर 13 रोजी मध्यरात्री 12.30 ते एक वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी राहुल महाजन, प्रशांत बावस्कर-महाजन, रवींद्र ईश्वर चव्हाण, शुभम सुरेश धोबी (रसलपूर) आवाज करीत असताना तक्रारदाराने का आवाज करीत आहात? अशी विचारणा केल्याने आरोपींनी काठीने तसेच विटांनी मारहाण केली. तपास जितेंद्र पाटील करीत आहेत.