रावेर : तालुक्यातील रसलपूर येथून चोरट्यांनी घराबाहेर बांधलेला 15 हजार रुपये किंमतीचा गोर्हा चोरून नेला.
रावेर पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकरी सचिन भास्कर धनके (30, रसलपूर) यांच्या घराबाहेर 15 हजार रुपये किंमतीचा लाल रंगाचा गोर्हा बांधलेला असताना चोरट्यांनी 2 ते 3 रोजीच्या मध्यरात्री तो लांबवला. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.