न्युयोर्क-जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा मागील काही दिवसांपासून होत आहे. यातील रसायनशास्त्र विभागातील पुरस्कार्थींची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील फ्रान्सिस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि ग्रेगरी विंटर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रोटीन आणि एन्झामाईन विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. अरनॉल्ड यांनी एन्झामाईन बनविण्याची थेट प्रक्रिया शोधून काढली आहे. अशापद्धतीने तयार केलेले एन्झामाईन जैविक इंधनापासून फार्मास्युटीकलमध्ये वापरण्यात येतील. यासोबतच स्मिथ आणि विंटर यांनीही अनुक्रमे प्रोटीन निर्मिती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारा घटक बनविण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
सोमवारी औषधशास्त्र विषयातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर केली. अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. एलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांना संयुक्तरित्या जाहीर झाला आहे. या दोघांना हा पुरस्कार कर्करोगावरील उपचारांच्या शोधासाठी देण्यात येणार आहे. या दोघांनी कर्करोगावर उपचारांसाठी अशी थेरपी शोधून काढली ज्याद्वारे कर्करोगाच्या ट्यूमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकार शक्ती वाढवता येऊ शकते. तर भौतिकशास्त्रासाठी दिला असून ३ जणांना तो देण्यात येणार आहे.
आर्थर आश्कीन यांना तसेच गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड यांना विभागून देण्यात आला आहे. डोना या कॅनडातील असून या तिघांनीही लेझर फिजिक्स विषयात केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे. गेल्या ७० वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.