रसुलपूरला दोन गटात हाणामारी ; तीन जण जखमी

0

एकास डोक्याला गंभीर दुखापत ; दोन्ही गटाच्या 12 आरोपींविरुद्ध गुन्हे

रावेर- तालुक्यातील रसलपूर येथे सोमवारी सायंकाळी उशीरा एकाच समाजातील दोन गटात हाणामारी होवून तीन जण जखमी झाले. त्यातील एकावर सावद्यात उपचार सुरू असून रावेर पोलिसात परस्परविरोधी तक्रारी वरून दोन्ही गटातील 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

किरकोळ कारणाचा वाद विकोपाला
उमर खान असगर खान (रा.रसुलपूर) यांनी पोलिसात तक्रार दिली की, रहदारीच्या रस्त्यात शेळ्या बांधू नकोस, असे सांगितल्याचा राग आल्याने संशयीत आरोपी शेख चाँद शेख आमद व वगैरे सहा जणांनी हातात लाठ्या-काठ्या व लोखंडी टॉमी घेऊन मारहाण करून फिर्यादी व त्यांच्या सोबतच्या अन्य सहा जणांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पाईपाने मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात असगर खान महेमुद खान हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सावदा येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी शेख चाँद यांच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्‍या गटातर्फे ताहेरा बी शेख चाँद (रा.रसलपूर, ता.रावेर) यांनी तक्रार दिली की, आमच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करून तथा आरोपीनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या घरातील सहा लोकांना लाठ्या-काठया, दगड व लोखंडी पाईपने मारहाण केली. यात शेख सद्दाम व शेख नासीर हे दोघी जखमी आहेत. या तक्रारीवरून उमर खान असगर खानसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.