रस्ता ओलांडतांना वाहनाची एकाला धडक

0

जळगाव । मराठा समाजाचा 17 जोडप्यांचा आयोजित विवाह सोहळ्यास आलेला तरूण महाबळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येत असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरूण रस्त्यावर पडल्याची घटना रविवारी दुपारी घडली. घटना कळाल्यावर उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले. महादू भागवत लाटे (40) पिंपळकोठा (एरंडोल) असे जखमीचे नाव असून शहरातील येथील सागर पार्क मैदानावर दक्षिण मराठा समाजातर्फे 17 जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आज आयोजन केले होते. महादू लाटे यांचे चुलतबंधु राजू संतोष लाटे यांची मुलगी अर्चना तसेच भाचा समाधान (मुळ चोरगाव) ह.मु. पिंपळकोठा या दोघांचा विवाह येथे होता. या सोहळयास उपस्थित राहण्यासाठी महादू लाटे हे कुटुंबियांसह सागर पार्कवर आले होते. दरम्यान महादू लाटे हे सागर पार्ककडे येण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगातील वाहनाने धडक दिल्याने ते खाली कोसळले. ही घटना रविवारी सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. धडक दिल्यानंतर न थांबता वाहन चालक सुसाट वेगात पसार झाला. ही घटनाबघीतल्यावर मंडपातील काही नातेवाईकांसह प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेतली.