रस्ता चांगला न केल्यास कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली घालीन

0

जालना | केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याहस्ते शनिवारी जालन्यातील वाटूर येथे शेगाव-पंढरपूर दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात गडकरींनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, की पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना या रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या रस्त्याचे काम चांगले होत नसेल तर फक्त मला कळवा. रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला मी बुलडोझरखाली घातल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते.

गाठ माझ्याशी आहे
देशाच्या रस्तेवाहतूक मंत्रालयाची जबाबदारी घेऊन आता मला तीन वर्षे झालीत. या तीन वर्षात मी देशभरात 6 लाख कोटींची कामे केली; पण लक्ष्मी दर्शन घेतले नाही. मला कोणत्या कामाचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, हेही कधी माहीत नसते. मला कुणी भेटतही नाही. आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरच्या, एकाही पैशाचा मी दबलेला नाही. शेगाव ते पंढरपूर या दोन संताभूमींना जोडणाऱ्या रस्त्याचे काम चांगळेच झाले पाहिजे. नाहीतर मग त्या कॉन्ट्रॅक्टरची गाठ माझ्याशी आहे, हे त्याने लक्षात ठेवावे.