नवापूर । अमरावती ते हाजीर पर्यत रस्ता चौपदीरीकरणाचे काम सुरु असून नवापूर ते चरणमाळ दहिवेलचा पुढे या कामाला वेग आला आहे. या मार्गावरील अडथळे दुर करुन लहान पुल तयार करण्यात येत आह.े जेथे टेकड्या आहेत ते खोदुन पुढे होत आहे. ही कामे प्रगतीपथावर असून नंदुरबार व धुळे हे अंतर कमी होणार आहे.
अपघात रोखण्यास मदत
चिंचपाडापासुन नवापूर शहर पर्यत रस्ते कामाला सुरुवात होऊन शहरातील देवळफळी भागात ही काम सुरु करण्यात आली आहे या चौपदरीकरणात अनेकांची शेती व घरे ही जाणार आहेत.या चौपदीकरणा नंतर नवापूर ते नंदुरबार व धुळे हे अंतर कमी होणार आहे अपघाताचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होणार आहे चौपदीकरण कामासाठी संबघीत कंपनीचे लोक रात्र दिवस काम करत असून चौपदीकपण काम प्रगती पथावर आहे.