मुक्ताईनगर : पुरनाड फाटा ते ईच्छापूर रस्ता तत्काळ दुरुस्त व्हावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन तसेच खड्ड्यांची विधीवत पुजा असे आगळेवेगळे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान येथील पुरणाड फाट्यावर हजारो शिवसैनिकांच्या सहभागात करण्यात आले.