बोदवड : बोदवड-भुसावळ रस्त्यासह मलकापूर रस्त्याची चाळण झाल्यानंतर लोकप्रतिनिधी व शासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने लक्ष वेधण्यासाठी विनोद पाडर यांनी लोटांगण घालून आंदोलन केल्याने तालुकावासीयांसाठी हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान, यानंतरही रस्ता दुरुस्त न झाल्यास रस्त्यांमधील खड्ड्यांमध्ये आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यांची होती उपस्थिती
आंदोलनप्रसंगी तालुका प्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, उपजिल्हा प्रमुख कलिम शेख, शहर प्रमुख हर्षल बडगुजर, अ.ता.प्रमुख अय्युब कुरेशी, विभाग प्रमुख गोपाळ पाटील, दीपक माळी, अतिष सारवाण, सुवर्णसिंग राजपूत, पवन माळी, सुनील बैदे, अप्पू भांजा, भूषण भोई, मुकेश महाजन, समीर शेख उपस्थित होते.