नवापूर । शहरातील बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला असुन खुद एसटी चालकांना व प्रवाशांना याचा त्रास होत आहे. रोज एसटी बसस्थानकात होणार्या रोजच्या बस फेर्या व मुसळधार पाऊस झाल्याने दोन मोठे खड्डे पडुन डबके साचले आहे.त्यामुळे एसटी चालकाला खड्डा चुकवतांना मोठी कसरत करावी लागत असुन अनेक वेळा डबक्याचे पाणी व चिखल उडुन प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे अनेकवेळा यावरून प्रवासी व चालकात तु तु मै मै होऊन भांडणे होत असतात. त्यामुळे या खड्ड्यात मुरूम माती टाकून दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.