शिंदखेडा । सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या बेपवाईने आज सकाळी मोठा बस अपघात होताहोता थोडक्यात टळला आणि बसमधील 50 प्रवासी सुदैवाने बचावले. अन्यथा ही बस उलटून मोठाच अनर्थ घडला असता. परंतु प्रवाशांचे दैव बलवत्तर होते असेच चित्र समोर आले आहे. शिंदखेडा ते विरदेल हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दुरूस्ती केला जात आहे यासाठी खडमुरुम,दगड आदि साहित्याचे ढिगारे रस्त्यावर इतस्ततः पसरुन ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे वाहनांच्या रहदारीला मोठाच धोका झाला आहे. दुचाकीवाल्यांनाही जीव मुठीत धरुन वापरावे लागत आहे.वाहनांच्या वावरातून एखादी खडी उडून कुणाचा डोळा फुटेल याचाही नेम राहिलेला नाही.
नागरिकांनी व्यक्त केला रोष
आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास शिंदखेडा आगाराची शिंदखेडा -विरदेल बस विरदेल गावानजीक आली असता दुसर्या वाहनालाटाळतांना प्रवासी बस मरुु माच्या ढिगार्यावर चढली आणि ढिगारा खचल्याने चक्क रस्त्याच्या कडेला उतरली. चालकाने प्रसंगावधान राखनू कौशल्याने ही बस थांबवली. मात्र ती अर्धी कलली होती. जर ती बस आणखी कलली असती तर ती नक्कीच उलटली असती. सुदैवाने तसे झाले नाही. मात्र घाबरलेले प्रवासी पटापट बसमधनू बाहरे पडले प्रवाशांनी व ग्रामस्थांनी याबाबत साबां विभागावर व ठेकेदाराच्या बपेवाईवर राग व्यक्त केला.