बोदवड। राज्य सरकारने राज्यातील अनेक राज्यमार्ग रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून त्या मार्गाचे सर्वेक्षणाचे कामसुध्दा सुरु झाले आहे. बर्हाणपूर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पहूर, औरंगाबाद हा राज्यमार्ग सुध्दा रुंद होणार असून बोदवड ते जामनेर साडेपाच मिटर रुंदी असून बोदवड ते मुक्ताईनगर सात मिटर असून या संपूर्ण रस्त्याची डांबरीकरण रुंदी 15 मिटर होणार असून या रस्त्याच्या मध्यभागापासून 9 मिटर अंतरावरील जे झाड येईल त्या झाडांची कत्तल होणार आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे हजारो झाडांची कत्तल होणार आहे.
रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली रस्ता होईल वाळवंटासारखा
सरकार एकीकडे वृक्ष लागवड करीत आहे आणि रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली संपूर्ण रस्ता वाळवंटासारखा होईल. या रस्त्यावर एकही झाड सावलीसाठी शिल्लक राहणार नाही. जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर राज्य मार्गावर हजारो निंबाची, चिंचाची झाडे असून रस्ता रुंदीकरणामुळे बेसुमार झाडांची कत्तल होणार आहे. 9 मिटरच्या आतमधील निंब, चिंच या झाडांना अनुक्रमांक देवून मोजमाप करण्याचे काम हायवे इंजिनिअरींग कन्सल्टंटद्वारा मोजमाप सुरु केले असे सर्वेव्हर रजनिश पटेल यांनी सांगितले.