रस्ता लुट करणारी टोळी जेरबंद

0

स्कार्पिओ कारसह चौघे पोलीसांच्या जाळ्यात

फैजपूर । फैजपूर शहरापासून जवळच असलेल्या पिंपरूळ फाट्याजवळ 19 जुलै रोजी रात्री 8.30वा सिनेस्टाईल या रस्ता लुटीत ट्रकच्या पुढे स्कार्पिओ कार लावून ट्रक चालक व त्याच्या साथीदाराला मारहाण करीत ट्रक मधील 7 हजार रुपये रोख व दोन मोबाईल असा 13 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वेगाने तपास चक्रे फिरवून आरोपींना स्कार्पिओ कारसह ताब्यात घेतले पोलिसांच्या तपासात आरोपी हे भुसावळ व पाडळसा तालुका यावल येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये भावेश हेमंत पालक (वय-19, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ), हर्षल रवींद्र पाटील (वय-23, आनंद नगर, भुसावळ), घनश्याम शिरीष चौधरी (वय-23, पाडळसा), भरत मेघश्याम चौधरी (वय-19, पाडळसा) यांचा समावेश आहे आरोपी हे स्थानिक भुसावळ व पाडळसा येथील असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

यांनी केली कारवाई
सपोनि दत्तात्रय निकम, फौ. जिजाबराव पाटील, स.फौ.विजय पाचपोळ, हे.कॉ. इकबाल सैय्यद, उमेश पाटील, रमण सुरळकर, योगेश महाजन, या पथकाने ही कारवाई केली. ट्रकचालक सुरेन्द्र सिंह यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळाला डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांनी भेट दिली तर या घटनेत वापरलेली स्कार्पियो कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहे.