रस्ता सुरक्षेबाबत शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रबोधन करण्याची गरज

0

जळगाव । दिवसेंदिवस होणारे रस्ता अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान महत्वाचे आहे तसेच आधुनिक काळात सायबर क्राईम रोखणे, महिलांचे सक्षमीकरण हे विषय देखिल तितकेच महत्वाचे यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून जनजागृती होणे गरजेचे आहे. यासोबतच अनेक जण छंद म्हणून वाहनांचा वापर करतात. वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. त्यामुळे महाविदयालय, शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षाबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कुलगुरू पी.पी.पाटील यांनी केले. जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा यासाठी जनजागृती परीसंवादाचे आयोजन सोमवारी रोजी मुख्यालयातील मंगलम हॉल येथे करण्यात आले होते. या प्रसंगी कुलगुरू बोलत होते.

व्यासपीठावर पोलीस अधिक्षक दत्तात्रेय कराळे, चाळीसगाव अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, अप्पर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास शहरातील प्रत्येक शाळा महिविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वललाने झाली. यावेळी पुढे बोलतांना कुलगुरू म्हणाले की, 21 व शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. यामुळे सायबर गुन्हे, रस्त सुरक्षा अभियान, दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. या संदर्भाची जनजागृती प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. पोलीस, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक हे महत्वाचे घटक आहेत. कायदा पाळला तर पोलीसांवरील ताण कमी होईल. दैनंदिन वृत्रपत्तांतून अपघाताच्या बातम्या वाचण्यात येत असतात. विद्यार्थी जीव मुठीत घेवून प्रवास करीत असतात. असे ही त्यांनी यावेळी सांगीतले़

424 जणांचा अपघातात मृत्यू जिल्ह्यात अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला 5 अपघात होतात यात दोन जणांचा नाहक बळी जातो, वर्षभरात 882 अपघात झालेत यात 425 जणांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक प्रमाणे युवा वर्गाचे आहे.आत शाळा, महाविद्यालये सुरू झालीत यामुळे त्यांच्यात जनजागृती होणे गरजेचे आहे. आजारापेक्षा अपघातात मरणार्‍यांची संख्या अधिक आहे. दरवर्षी दिड लाख लोक अपघातात मरण पावतात, यात 80 ते 85 ट्क्के प्रमाणे हे घरातील कत्या पुरूषांचे असते. 5 वर्षांत वाहनांची संख्या दुप्पट झाली आहे. यामुळे वाहतुक नियमांबाबत जनजागृती कमी पडतेय. रहदारीचा दहशतवाद निर्माण होतोय, सर्वांनि एकत्र येवून नियम पाळावे, असे पोलिस अधीक्षक कराळे यांनी सांगितले.

ऑनलाईन-ऑफलाईन माहिती पोहचवा
तंत्रज्ञानाचे युग असून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वात जास्त मोबाईल इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे रस्ता सुरक्षा, तसेच अपघाताबातच्या जनजागृती विषयीचे विडीओ विद्यार्थ्यांना नेटवर ऑफलाईन व ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याने ते सहजच त्यांच्यापर्यंत पोहचतात. तर गुगुलने सुरू केल्या नवीनच टुल्समुळे शहरात कोणत्याही भागात रहदारी झाली तसेच अपघात झाल्यास आपल्याला लागलीच नेटवर दिसून येते. विद्यार्थ्यांनमध्ये प्रबोधन करायचे असेल तर नेटवर जनजागृतीपर विडीओ शेअर करून त्यांच्यापर्यंत पोहचवा असे मत दैनिक जनशक्ती वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक शेखर पाटील यांनी व्यक्त केले.