चोपडा । यावल रस्त्यालगत असलेल्या पवार नगर, सानेगुरूजी नगर, राधाकृष्ण नगर भागातील महिलांनी रस्ते व गटारी या मुलभुत सुविधांसाठी नगरपालिकेवर मोर्चा आणून मुख्याधिकारी बबन तडवी यांना निवेदन दिले. परिसरात बर्याच वर्षापासून याभागात नागरी मुलभूत सुविधा रस्ते गटारी नसल्याने नागरीकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने या परीसरातील महिलांनी मोर्चाद्वारे मोठ्या संख्येने नगरपालिकेत येऊन नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांना भेटण्यासाठी मोर्चा आणला होता. परंतू नगराध्यक्षा नसल्याने मोर्चा मुख्याधिकारी बबन तडवी यांचा कार्यालयाकडे वळवला. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
सुविधा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याजवळ सर्व महिलांनी समस्यांचा पाढा वाचला. आम्ही गेल्या 20 वर्षापासून याठिकाणी राहत आहोत परंतू रस्ते गटारी या सुविधा मिळत नाहीत. नव्याने निर्माण झालेल्या काँलण्यामध्ये रस्ते गटारी झाल्याचे आरोप केला. तसेच गोड पाण्याची पाईप लाईन टाकल्याने रस्ता अजून जास्त खराब झाला असून पायी चालने कठिण झाले असल्याचे महिलांनी सांगितले. यावर मुख्याधिकारी बबन तडवी यांनी मोर्चेकर महिलांना सागितले की, आज नगरपालिके कडे निधी नाही. आज मी काही आश्वासन देऊ शकत नाही परंतु येणार्या एक ते दिड वर्षात काही तरी समस्येचं निराकरण करू असे सांगितले. महिलांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. परंतू आम्ही नगराध्यक्ष यांना भेटू, जर का रस्ते गटारी नाही झाले तर आम्ही उपोषण करू, असा इशारा यावेळी महिलांनी दिला.