पुरंदर । गुळुंचे येथील श्री क्षेत्र ज्योर्तिलिंग मंदिराकडे जाणार्या तसेच गुळुंच्याहून मोरगावकडे जाणार्या 110 मीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मे महिन्यात सुरू करण्यात आली होती. मात्र दीड महिन्यापासून ही कामे रखडली असून, उर्वरित कामे आता पाावसाळा संपल्यानंतर पूर्ण होतील, असे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.
काटेबारस यात्रा पाहण्यासाठी तसेच ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. त्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. या रस्त्याच्या डांबरी करणाच्या कामाला दीड महिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली होती. 320 मीटर लांबीचा रस्ता व गुळुंचे-मोरगाव रस्त्याच्या 110 मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरी करणाचे काम हाती घेण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कडेची झुडपे काढून मुरमी करण पूर्ण केले. मात्र, त्यानंतर रस्त्याचे काम रखडले. काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक अवधी होता. मात्र काम झाले नसल्याने उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट पाहावी लागणार असल्याने अनेक ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या कामावर नाराजी व्यस्त केली. दरम्यान, गावातून जाणार्या व पुढे नगर रस्त्याला मिळणार्या गुळुंचे-मोरगावहा रस्ता एक किलोमीटर लांबीचा असून, अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील 110 मीटर लांबीचे काम होणार असून, उर्वरित काम व्हावे यासाठी लोक प्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. दरम्यान, कामाचा आदेश मिळाल्यानंतर काम पूर्ण करण्यास पुरेसावेळ नव्हता. त्यामुळे काम करता आले नाही. पावसाळा संपल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता पी. एम.जगताप यांनी सांगितले.