जळगाव । महापालिकेची गेल्या काही वर्षापासून आर्थिक परिस्थिती नसल्याने शहरातील रस्ते दुरुस्तीसह इतर अनेक विकास कामे होवू शकली नाही. आता शहरात अमृत योजने अंतर्गत शहरातील सर्व रस्ते खोदले जाणार आहे. यामुळे यारस्त्यांची दुरुस्तीसाठी 500 कोटी रुपये शासनाने द्यावे अशा मागणीचे पत्र आज महापौर ललित कोल्हे यांनी मुख्यमंत्री यांना दिले. दरम्यान, शहरातील मक्तेदाराने खोदलेले रस्ते व्यवस्थित करून द्यावेत अशी सूचना महापौर कोल्हे यांनी महापालिका अधिकारी व मक्तेदाराचे अभियंता यांच्या बैठकीत दिली.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट
गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. यामुळे महापालिका कर्मचार्यांना वेतन देण्यापासून शहरात मुलभूत नागरी सुविधा देखील देऊ शकत नाही. दैनंदिन अत्यावश्यक खर्चासह नागरिकांना सुविधा देखील उपलब्ध करून देण्यास कसरत करावी लागत आहेत. शहराच्या वाढत्या विस्तारानूसार वाढीव भाग मोठ्या प्रमाणावर विकसित आहे. मात्र, काही वर्षांपासून शहरातील रस्ते दुरुस्तींसह ठोस विकास कामे पूर्ण करता आलेली नाही. सध्या अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे कामे सुरु आहेत. यामुळे रस्त्यांचे खोदकाम करण्यात येत असून, रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. यामुळे मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून शहरातील रस्ते दुरूस्तीसाठी 500 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी पत्राद्वारे महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्रान अमृत रोजनेंतर्गत मक्तेदाराने खोदून ठेवलेले विविध ठिकाणचे रस्ते ठिकाणाची तातडीने बुजाई करावी अशा सूचना महापौरांनी केल्रा आहेत.
मक्तेदाराचे अभियंते, अधिकार्यांसोबत बैठक
महापालिकेला अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनी टाकण्याचे काम शहरात सुरू आहे. परंतू मक्देताराकंडून रस्ते खोदल्यानंतर ते व्यवस्थित बुजविले जात नाही. तसेच त्यांचे सपाटीकरण केले जात नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी खोदलेले खड्डे दिसत नसून काम सुरू आहे तिथे सावधानतेच्या उपाययोजना केलेल्या नाही. याबाबत तक्रारींची दखल घेवून महापौर कोल्हेंनी आज मक्तेदाराचे अभियंते, शहर अभियंता डी. बी. दाभाडे, बांधकाम अभियंता सुनील भोळे यांची बैठक घेतली. बैठकीत खोदलेले रस्ते व्यवस्थित करण्याचे तसेच सावधानतेच्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. तर मक्तेदाराने येत्या आठ दिवसात ज्या भागातील कामे झालेल्या आहे ते रस्ते व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले.