कर्जत : कर्जतमधील मुख्य रस्त्यांकर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे तक्रार करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या विरोधात कर्जत आरपीआयने रास्ता रोकोचा इशारा देत कर्जत सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. गेल्या दोन महिन्यापासून दहिवली प्ाूलापासून ते चौक फाटयापर्यंत मोठया प्रमणात प्रचंड खडडे पडले आहेत. वाहन चालकांना वाहन चालविताना मोठया प्रमाणात हाल सहन करावे लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
कर्जत चौक रस्त्याची लांबी सुमारे 9 कि.मी आहे तो प्रवास करण्यासाठी प्ाूर्वी जेमतेम 15 मिनिट लागत असे मात्र आता या रस्त्याची चाळण झाल्याने सुमारे 35 ते 40 मिनिटे खर्च करावी लागत आहेत. तसेच चारफाटा ते नेरळ चे अंतर 14 कि.मी आहे. तेही पार करण्यासाठी एक तास खर्च करावा लागतो. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याने या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आरपीआय तालूकाध्यक्ष राहूल डाळिंबकर, कोकण सचिव मारुती गायककाड, नगरसेवक अरविंद मोरे, किशोर गायकवाड, महिलाध्यक्षा वैशाली भोसले, तालूका सचिव मनोज गायकवाड, प्रेमनाथ जाधव आदि आरपीआय कायकर्ते उपस्थित होते.