पिंपरी-पिंपळे सौदागर मधील कोकणे चौक ते कासारवाडी बीआरटी रस्ता दोन वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्चून बनविण्यात आला. सार्वजनिक वाहतूक सुरक्षित आणि जलदगतीने होण्यासाठी आपल्या पिंपरी चिंचवड शहरात बीआरटी रस्ता प्रकल्पाचे मोठे जाळे बनविण्यात आले.परंतु योग्य नियोजनाअभावी सदरचे प्रकल्प अद्याप कायमस्वरूपी सुरू झाले नाही. शासनाच्या लोककरांच्या करोडो रुपयांचे यामुळे नुकसान होत आहे.
पालिकेकडून दिशाभूल
शहरातील काही सामाजिक संस्था याबाबत आवाज उठवीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही याबाबत ताशेरे ओढलेले आहेत. तात्पुरते स्वरूपात ट्रायल रन करून नागरीकांची तसेच न्यायालायचीही दिशाभूल महापालिका प्रशासन करीत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पणे तयार झालेल्या बीआरटी नवीन तयार केलेल्या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली जात आहे.प्रकल्पापूर्वी योग्य नियोजन न केल्यामुळे बीआरटी रस्ता प्रयोगाचे स्थान फक्त झालेले आहे.
हे देखील वाचा
सदरच्या बीआरटी रस्त्याचा वापर हा वाहनतळ, खेळाचे ठिकाण गोडावून म्हणून केला जात आहे. ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता सदरचा प्रकल्प राज्याने प्रामुख्याने पुणे व पिंपरी चिंचवड शहरात राबविला होता.त्या प्रमुख उद्देशाला हरताळ फसण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन करीत आहे.
गोविंद यशदा चौकामध्ये सध्या सब-वे रस्ता प्रकल्पाचे काम सुरू आहे. सदरच्या काम घेतलेल्या ठेकेदाराने बीआरटी प्रकल्पाची वाट लावून टाकली आहे.सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर ठेवले आहेत.कुठेही सुरक्षेचे नियम पाळलेले प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अमर आदियाल, तानाजी जवळकर,संतोष चव्हाण, आणि समिती अध्यक्ष विजय पाटील यांना दिसून आले नाही.त्यामुळे दुचाकी चालकांना या चौकातून जाताना जीव मुठीत धरून चालावा लागतो.रस्ताच्या कडेला टाकलेल्या राडा रोड्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.बीआरटी प्रकल्पाची काळजी घेऊनच सब वे प्रकल्प बनविण्यात यावा असे प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीस वाटते.
या पाहणी दरम्यान समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” सध्या शहरात बऱ्याच ठिकाणी सब – वे बनविण्याचे काम सुरू असून.त्यासाठी करोडो रुपयांची तरतूद महापालिकेने केलेली आहे.सदरच्या सर्व प्रकल्पाच्या ठिकाणी महापालिका आयुक्तानीं भेट देवून सत्य परस्थितिची पाहणी करावी.आणि दोषी असलेल्या अधिकारयांवर तातडीने कार्यवाही करावी.” समिति सदस्य अमरसिंग आदियाल म्हणाले,” यशदा गोविंद चौक परिसरातील बी आर टी प्रकल्पाची स्थिति दयनीय आहे.कोणतेही सुरसक्षेचे नियम ठेकेदाराने न पाळल्यामुळे बस स्थानकाचे नुकसान होत आहे.काम करत असताना निर्माण झालेल्या राडारोडयाची योग्य प्रकार विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या सुरक्षाविषयक सूचना दिशादर्शक व फलकांचा वापर कामाच्या ठिकाणी करने क्रमप्राप्त आहे.अपघात होण्याच्या अगोदर पालिकेने योग्य नियोजन करने आवश्यक आहे.”