रस्ते विकासासाठी 12 हजार 950 कोटींचा निधी

मुंबई: आज राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. राज्यातील रस्ते विकासासाठी 12 हजार 950 कोटींची घोषणा अजित पवार यांनी केली.

अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. 7 हजार कोटींची तरतूद ग्रामीण आणि शहरी आरोग्य सेवेसाठी करण्यात आली आहे तर महापालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेसाठी 5 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.