रावेर । जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचे केंद्र असून निवडून आलेले सर्व सदस्यांनी ग्रामीण भागाच्या जनतेच्या विश्वासाला तळा जाऊ देऊ नका ग्रामीण भागातील रस्ते, जलसंवर्धनाचे कामांना प्राधान्य देऊन केंद्र व राज्यातील सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणावा असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार जावळे बोलत होते खासदार रक्षा खडसे यांची देखील विशेष उपस्थिती होती. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरर्यांची उपस्थिती होती.
या मान्यवरांचा झाला सत्कार
जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पंचायत समिति सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, रंजना पाटील, नंदा पाटिल, सुरेखा पाटील, आत्माराम कोळी, पंचायत समिती सदस्य प्रतिभा बोरोले, कविता कोळी, जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, योगेश पाटिल, रूपाली कोळी, दिपक पाटील, वानखेडे आदींचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
दरम्यान या कार्यक्रमाला बाजार समिती उपसभापती प्रमोद धनके, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सरचिटणीस शिवाजीराव पाटील, महेश चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य महेश पाटील, भाजपा युवा भाजपा युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्र पाटील, सुरेश धनके, कोकिळा पाटील, पीपल्स बॅक व्यवस्थापक प्रकाश पाटील, ग.स. अध्यक्ष तुकाराम बोरवले, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, संदीप सावळे, प्रल्हाद पाटील, नरेंद्र पाटील, कृषी उपन्न बाजार समिति संचालक श्रीकांत महाजन, पितांबर पाटील, निळकंठ चौधरी, पंकज येवले, प्रमीला पाटील, दिलीप पाटील, जनाबाई महाजन, कल्पना पाटील, कृष्णराज पाटील, अरुण पाटील, सैय्यद अजगर, अॅड. योगेश गजरे, गोंडु महाजन, अशोक वाणी, डी.सी.पाटील, वासु नरवाड़े, डॉ. सुभाष पाटील, सूर्यभान चौधरी, सुरेश पाटील, दुर्गादास पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाजार समिती सचिव गोपाळ महाजन यांनी केले.
सर्व शेतकर्यांसाठी कटीबध्द
तालुक्यातील शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषि उपन्न बाजार समिति प्रत्येक वेळी कटिबध्द आहे. केळीसाठी आम्हाला स्वतंत्र टनकाटे उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधिंनी मदत करावी तसेच बाजार समितीचे ज्या व्यापार्यांकड़े परवाने असेल त्यांच शेतकर्यांनी आपला माल द्यावा निवडून आलेले सर्व सदस्य ग्रामीण भागाचे आहे आणि बाजार समितीसुद्धा ग्रामीण शेतकर्यांची असल्याने आम्हाला अधिक लाभ होईल, असे प्रतिपादन बाजार समिती सभापती डॉ.राजेंद्र पाटील यांनी केले.