रस्त्यांच्या कामासाठी 27 कोटी निधी : आ.पाचर्णे

0

शिरूर : शिरूर हवेली मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी 27 कोटी रूपये अर्थसंकल्पातून मंजूर झाले असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली. शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये शिरूर हवेली मतदार संघातील रस्त्यांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे.

या रस्त्यांची होणार कामे
शिरूर सुपा सांगवी रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 69 हजार, मरकळ तुळापूर लोणीकंद केसनंद थेऊर रस्ता सुधारणा करणे 2 कोटी 81 हजार, अण्णापुर ते शिरूर रस्ता सुधारणा करणे 4 कोटी, निमगाव म्हाळुंगी ते रांजणगाव गणपती रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 20 लक्ष, रांजणगाव सांडस नागरगाव कुरुळी 3 कोटी 23 लक्ष रुपये, आरणगाव, आलेगाव ,नागरगाव, वडगाव, सादलगाव, मांडवगण, रस्ता 4 कोटि 52 लक्ष, शिरूर निमोणे गुनाट रस्ता सुधारणा करणे 5 कोटी रूपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.

पुणे शिरूर रस्ता सहापदरी होणार
आ. पाचर्णे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शिरूर हवेली मतदार संघासाठी भरघोस निधी दिला असून पुणे शिरूर रस्ताही तेथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातूनच सहापदरी करून अंडर पास करण्याचे आश्‍वासन ही बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले असल्याचे आमदार पाचर्णे म्हणाले.