धरणगाव/जळगाव । शेतकर्यांच्या व ग्रामस्थांच्या हितासाठी रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. मतदारसंघात रस्ते विकासाला प्राधान्य दिले असून या परिसरातील पाळधी-झुरखेडा -दहिदुलले रस्त्यावरील झुरखेडा गावजवळील पूल व अंजनविहिरे – खामखेडा दरम्यानचा पुलांचा प्रश्न लवकरच मार्गी लावून त्यासाठी सुमारे 4 कोटी 25 लक्ष निधी उपलब्ध करणार, प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच दामू अण्णा पाटील हे होते. हिंगोणे, कल्याणे, पिंप्री, विहीर फाटा, सोनवद, बांभूळगाव रस्ता प्रजिमा 52 या 2 कोटी 50 लाखाच्या रस्त्याचे भूमीपूजन विहीर फाटा, कल्याणे व हिंगोणे येथे सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या मार्गाच्या 14 किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच या रस्त्यावर 2 मोर्यांचे काम ही हाती घेण्यात आले आहे.
विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान
यावेळी ना.पाटील यांनी सांगितले की, दहिदुल्ला, गाढोदा हा रस्ता पाटबंधारे विभागामार्फत मार्गी लावण्यासाठी 2 कोटी निधीची तरतूद करणार आहे.येत्या पावसाळ्यापूर्वी सोनवद पुलाचा प्रश्न अशोक जैन यांच्या सहकार्यातून सी.आर.सी. फंडातून मार्गी लावणार आहे. मतदारसंघातील विकास कामे पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी आवर्जून सांगितले. तालुक्यात विविध विकास कामांचा सपाटा सुरू करून टिका करणार्या विरोधकांना ना.गुलाबराव पाटील यांनी विकास कामाच्या माध्यमातून उत्तरे देत आहे. ना.पाटील यांच्या विकास कामांच्या झंझावतामुळे शेतकरी ,विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील ग्रा.पं.सरपंच, पदाधिकारी व वि.का.सोसायटी तसेच ग्रामस्थां मार्फत ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.संजय पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, पं.स.उप सभापती प्रेमराज पाटील, सा.बां.चे उपअभियंता ए.जे.पाटील, माजी सभापती दिपक सोनवणे, डी.ओ. पाटील, पी.एम.पाटील, दामू पाटील, चंदुशेठ भाटीया, मोहन पाटील, सरपंच पिंप्री रतन पवार, अरुण पाटील, पवन पाटील, विजय पाटील, रविंद्र पाटील, साहेबराव कोळी, दगडू चौधरी, ठेकेदार राहुल सोनवणे, यांच्यासह परिसरातील अहिरे, पष्टाने, खामखेडा झुरखेडा सरपंच, ग्रा.पं.सदस्य, वि.का.सो.चे संचालक, शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एम.पाटील यांनी केले. तर आभार संजय पाटील सर यांनी मानले.