अमळनेर । प्राणिमात्रांवर प्रेम करणारा अवलिया डॉ दिलीप खंडेराव शिंदे यांनी अनाथ प्राण्यांची निस्वार्थ पणे रस्त्यावरील आजारी, अपंग, अनाथ प्राण्यांची सेवा केली. परंतु आज त्यांची शारीरिक व आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे सुमारे 40 मांजरी व 20 कुत्रे त्यांचे संगोपन करण्यासाठी प्राणीमित्र नागरिकांना मदतीचा व सांभाळण्याचे आवाहन केले आहे. जीवे…जीवस्य…जीवनम. या श्लोकातून गेल्या 15 वर्षांपासून डॉ.दिलीप खंडेराव शिंदे यांनी 40 मांजरी व 20 कुत्रे घरात पाळले आहेत.
अनाथ प्राण्यांची निस्वार्थ पणे रस्त्यावरील आजारी, अपंग, अनाथ प्राण्यांची सेवा केली आहे. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती आता खालावली असल्याने त्या प्राण्याचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी प्राणी मित्र व नागरिकांना आवाहन केले आहे.
प्राण्यांसाठी मदतीचे आवाहन
रस्त्यावर कोणताही प्राणी अनाथासारखा फिरु नये, यासाठी त्यांची खाण्याची व निवार्याची सोय आम्ही केली. रास्त्यावर पडलेले शिळे अन्न खाऊन मुके प्रांण्यांना इजा होते किंवा ते दगावतात. जे आपण खातो तेच प्राण्यांना द्यायला हवे असते गावकरी समाजातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या सहकार्य मिळाल्यास ते प्राणी पुन्हा अनाथ होणार नाहीत. त्यामुळे आपण सहकार्य करून त्या प्राण्यांना अन्न औषध व इतर आर्थिक मदत करू शकतात तर जे निरोगी प्राणी आहेत ते इतरांनी दत्तक घेण्याचे आवाहन डॉ. दिलीप शिंदे यांनी केले आहे.
आजही आमचे काम खूप छोट आहे, अजून हजारो प्राण्यांना मदत करता यावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी भविष्यात छोटे हॉस्पिटल व निवार्याची सोय करण्याचा आमचा मानस आहे, आमचे हे कार्य अविरत सुरु ठेवून नागरिक आम्हाला सढळ हाताने मदत करतील अशी अपेक्षा आहे.
-डॉ. दिलीप खंडेराव शिंदे