रस्त्याच्या कामासाठी सल्लागारांची नियुक्ती

0

पिंपरी-चिंचवड : नवनगर विकास प्राधिकरण विकास योजना हद्दीतील रावेत सीडी वर्कपासून वाल्हेकरवाडी चौकापर्यंतचा 34.50 मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी मे.पेव्हेटेक कन्स्लटंटस यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. दरम्यान, सल्लागार नेमणुकीवर टीका होत असतानाही सत्ताधार्‍यांनी सल्लागार नेमण्याचा सपाटा लावला आहे.

मोशी येथे स्टेडीयम
महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये आराखड्यामध्ये मोशी येथे स्टेडियम बांधण्याचे आरक्षण आहे. आरक्षणाचे क्षेत्र 45,600 चौरस मीटर आहे. त्यापैकी 20,000 चौरस मीटर क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित क्षेत्राचा ताबा घेणे प्रस्तावित आहे. याकामासाठी इनग्रेन आणि स्पेस ग्रुप यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर पांजरपोळ ते पुणे आळंदी या विकास आराखड्यातील 90 मीटर रंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी पेव्हेटेक कन्स्लटंटस यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली.

पिंपळे सौदागरमध्ये क्रीडांगण
पिंपळेसौदागर येथील आरक्षण क्रमांक 367 ’अ’ खेळाचे मैदान विकसित करणे, आरक्षण क्रमांक 362 खेळाचे मैदान विकसित करणे आणि शिल्प बॉल तयार करणे या कामासाठी मे.सचिन आपटे अ‍ॅन्ड असोसिएट्स यांची आर्किटेक्ट म्हणून नेमणूक केली. या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. सुदर्शननगर चौक ते एफ.ओ.बी बांधणे तसेच तळवडे जकात नाका ते देहू कमान रस्त्याचे उर्वरित काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मे.इन्फ्रा किंग इंजिनियर्स प्रा. लि यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून छोट-मोठ्या कामांसाठी पालिका सल्लागार नेमत आहे. त्यावरुन विविध टीका, आरोप झाले. तरी, सत्ताधा-यांनी सल्लागार नेमणुकीचा सपाटा सुरुच ठेवला आहे.