रस्त्यात अडवून लग्नासाठी धमकी देणार्‍यास अटक

0
तरूण चिखली हरगुडे वस्तीतील 
पिंपरी-चिंचवड : मुलीला रस्त्यात अडवून ‘तु मला आवडतेस, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. लग्नाला होकार नाही दिला तर तुझ्या आई-वडिल आणि भावाला जिवे मारले जाईल’, अशी धमकी देणा-या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. हा प्रकार बुधवारी (दि. 12) चिंचवड येथील चेरीज स्वीट होम, स्पाईन रस्ता याठिकाणी घडला. सद्दाम जब्बार शेख (रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
क्लासजवळ पकडला हात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अकाऊंट क्लासला जात होती. चेरीज स्वीट येथे सद्दामने तिच्याशी लगट साधली. तिचा हात पकडून ‘तु मला खूप आवडतेस, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे’, असे म्हणून भर रस्त्यात तिचा विनयभंग केला. ‘तु लग्नाला होकार नाही दिलास तर तुझे आई-वडिला आणि भाऊ यांना जीवे मारणार’ असल्याचीही धमकी सद्दामने मुलीला दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.