रस्त्यात सापडलेले पाकिट तरूणास केले परत

0

जळगाव । रस्त्यात सापडलेले महत्वाची कागपत्रे असलेले पैशांच्या पाकिट संबंधिताला सन्मानाने परत देण्याची कामगिरी शहर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी रविवारी केली. पाकिटातील संपूर्ण कागपत्रे हे जशाच्या-तसे असल्याने संबंधिताच्या चेहर्‍यावर आनंद झळकून येत होता. पाकिट परत मिळाल्यामुळे त्या तरूणाने पोलिसांचे आभार मानले.

कृष्णा हॉटेल येथील कर्मचारी विनोद ठाकुर चव्हाण हा एमआयडीसी परिसरात वास्तव्यास आहे. विनोद हा सकाळी हॉटेलवर जाण्यासाठी निघाल्यानंतर वाटेतच खिश्यातील पाकिट पडले. काही वेळानंतर खिशात पाकिट नसल्याचे लक्षात येताच रस्त्यावर पाकिटाचा शोध घेऊन देखील मिळून आले नाही. दुपारी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच एका तरूणाल पाकिट मिळून आले. त्याने शहर पोलिसात येऊन सापडलेले पाकिट त्यांच्या ताब्यात दिले. पोलिस कर्मचारी सुरेश पाटील व माधव तरगुडे यांनी लागलीच पाकिटातील कागपत्रांची तपासणी केली. पाकिट हे विनोद चव्हाण नामक व्यक्तीचे असल्याने त्यावरील मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून पोलिसांनी खातरजमा केली. त्यानंतर विनोद यास पाकिट घेण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलवून घेतले. विनोद पोलिस ठाण्यात आल्यानंतर सुरेश पाटील व माधव तरगुडे यांनी दोन एटीएम कार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड असलेले पाकिट त्यास सन्मानाने परत केले. पाकिट मिळाल्याने विनोद याने पोलिसांचे आभार मानले.