रस्त्याला पडला काटेरी झुडपांचा वेढा

0

भुसावळ । शहरातील लिम्पस क्लब परिसरात असलेल्या रेल्वे कॉलनी भागातील रस्त्यांवर बाभुळसह काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांमुळे येथून मार्ग काढतांना वाहनधारकांना कसरत करावी लागते. तसेच झाडांची काटे अंगावर खरचटून जखमा होण्याचे प्रकारदेखील वारंवार घडत आहे.