देवरिया: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशमधील देवरिया येथे झालेल्या सभेत सपा आणि बसपावर सडकून टीका केली. सपा बसपा हे पक्ष रस्त्यावरील गुंडावर नियंत्रण ठेऊ शकत नाही, ते दहशतवाद सोबत कसे लढतील असा टोला मोदी यांनी लगावला. ते लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्याच्या प्रचार सभेत बोलत होते.
सपा आणि बसपा हे दहशतवादाशी लढू शकत नाही. कॉंग्रेस, सपा, बसपाचे धोरण आतंकवाद आणि नक्षलवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.