रस्त्यावरील बच, लोखंडी तुकडे केले साफ

0

चिखली : कुदळवाडी हा एमआयडीसी परिसर आहे. लहु उद्योजकांना लोखंडी वस्तू तयार करणार्‍या छोट्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून लोखंडी जॉब बनवले जातात. त्यानंतर रहाणारा कच्चा माल भंगारमध्ये विकले जाते. हे भरताना, उतरविताना रस्त्यावर बर, लोखंडी बारीक भुरा उडून पडत असतो. यामुळे अनेक वाहने पंक्चर होतात. यासाठी कंपन्यांना स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त या कंपन्यांशी संपर्क साधून लोखंडाचा कचरा रस्त्यावर पडू देऊ नये, यासाठी निवेदन दिले. तर या कंपन्यांनी रस्ता नीट साफ करून घेतला. यावेळी रोहित जगताप, आकाश साळुंखे, दीपक घन, अमित बालघरे, मनोज मोरे, नंदिप खरात, स्वप्निल पोटघन, किशोर लोंढे, स्वराज पिजंण, प्रशांत किवळे, करण पाखरे, यश जाधव, विशाल उमाप, अमोल रणसिंग आदी उपस्थित होते.
जय इंजिनिअरिंग, क्रियेटिव्ह इंजिनिअरिंग, फॉनेस एंटरप्रायजेस, राहुल एंटरप्रायजेस, योगेश एंटरप्रायजेस, रोहित एंटरप्रायजेस आदी कंपन्यांनी सहभाग नोंदविला.