रस्त्यावरील वेश्यांवर कारवाईची मागणी

0

आकुर्डी : येथे खुलेआम होणार्‍या वेश्याव्यवसायावर करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने उपायुक्तांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, मुंबई-पुणे महामार्गाकडून आकुर्डीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरील ग्रोव्हन लिमिटेड या कंपनी समोरील मोकळ्या पडीक जागेवर काही स्त्रीया तसेच तृतीय पंथांकडून देहविक्री केली जात आहे. रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या वाहन चालकांना अश्‍लिल हावभाव इशारे करून आडवणे, अशा विविध प्रकारामुळे येथील परिसरात वावरणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाकडे स्थानिक पोलिस प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी.