रस्त्यावर दुकान थाटणार्‍या चौघा दुकानदारांवर भुसावळात कारवाई

0

आरपीएफच्या कारवाईने गोरगरीब दुकानदारांमध्ये अन्यायाची भावना

भुसावळ- आरपीडी रस्त्यावर दुकाने लावणार्‍या चार विक्रेत्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा बलाने शुक्रवारी कारवाई केल्यानंतर गोरगरीब दुकानदारांनी या कारवाईचा निषेध व्यक्त करीत तीव्र संताप व्यक्त केला. अतिक्रमण काढल्यानंतर आरपीएफ रस्त्यावर दुकाने थाटू देत नसल्याने या दुकानदारांचा रोजी-रोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विक्रेत्यांनी कारवाईनंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या लोको ठाण्यासमोर शुक्रवारी सकाळी 10 वाजता गर्दी केल्यानंतर शहर पोलिसांनी घब्नास्थळी धाव घेत गर्दी पांगवली.

अतिक्रमण आढळताच कारवाई
रेल्वे प्रशासनाने गत डिसेंबर महिन्यात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवल्यानंतर हा परीसर मोकळा करण्यात आला असून मोकळ्या जागेला कंपाऊंड तयार केले जात आहे. मोकळ्या जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आरपीएफला गस्त घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आरपीडी रस्त्यावर कुणीही भाजीपाला, खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने अथवा हातगाडी लावल्यास त्यांच्याविरूध्द तत्काळ कारवाई केली जात असल्याने विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शुक्रवारी सुध्दा या मार्गावर दुकाने थाटल्याने आरपीएफ जवानांनी विक्रेत्यांविरूध्द रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई केली. या प्रकारानंतर विके्रते मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर शहर पोलिसांनी धाव घेत गर्दी पांगवली.