भुसावळ:- रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धत्तीने रीक्षा लावणार्या दोघा अॅपे रीक्षा चालकांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक पाटील यांच्या फिर्यादीनुसार 18 रोजी सकाळी 11 वाजता रीक्षा (क्रमांक एम.एच.19 सी.ई.4687) नाहाटा चौफुलीवर बेशिस्तपणे रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धत्तीने उभी केल्याने रीक्षा चालक मिलिंद अरुण हिवराळे (27, पंचशील नगर, भुसावळ) विरुद्ध 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच रीक्षा चालक मुस्ताक शेख शब्बीर शेख (वरणगाव) यानेही रीक्षा (एम.एच.19 व्ही.9374) डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेशिस्तपणे उभी केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.