साक्री। साक्री बसस्थानकाकडे जाणार्या रस्त्याच्या रहदारीचा प्रश्न सोडवण्यात पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने लोटगाड्याधारकांनी स्वतः रहदारी निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांना सहकार्य करू यासाठी प्रयत्न करणार असल्याचे साक्री पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
पोलिस स्टेशनमध्ये झाली बैठक
साक्री पोलिस स्टेशनच्या वतीने बसस्थानक रोडवरील लोटगाड्याधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. दि. 29 मे रोजी लोटगाड्याधारकांना उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण निलेश सोनवणे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. यावेळी लोटगाडीधारकांची बाजू ऐकून घेण्यात आली. पोलिस स्टेशनचे सहाय्यक पो.नि.अभिषेक पाटील, रवींद्र ठाकरे, नरेंद्र वाचवा आदी कर्मचारी उपस्थित होते.
शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर
रस्त्यावर रहदारी निर्माण होणार नाही याची जबाबदारी लोटगाड्याधारकांवर सोपविण्यात आली आहे. जर रहदारीस अडथळा निर्माण होत असेल आणि पोलिसांकडे तक्रार आली तर येत्या 30 तारखेनंतर कायदेशीर कारवाइृ करण्यात येईल, असा इशारा यावेळी पोलिसांनी दिला आहे. साक्री शहरात रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून काही व्यापारी दुकानासमोर लोटगाडी लावण्यासाठी लोटगाडी धारकांकडून भाडे घेत असतो. साक्री शहरातील मुख्य रस्त्यांवर लावण्यात येणार्या लोटगाडीधारक व फळ विक्रेत्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.