पिंपरी-चिंचवड : माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रहाटणी येथील मार्गाला त्यांचे नाव देऊन नामफलकाचे अनावरण महापौर नितीन काळजे यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी महापौरांनी स्व. मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
रहाटणी येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चौकात त्यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येवून त्या रस्त्याला मुंडे यांचे नावही देण्यात आले. याप्रसंगी महापौर काळजे यांच्यासह नगरसेविका योगिताताई नागरगोजे, सविता खुळे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, आबासेठ नागरगोजे, ज्ञानेश्वर नागरगोजे, शीतल मुंडे, सुभाष दराडे, गणेश ढाकणे, दीपक मनेरे, भरत ठाकूर, नरेश खुळे, संभाजी नागरगोजे, अरुण पवार आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रशस्ताविक बाबा त्रिभूवन यांनी केले, तर आभार दीपक नागरगोजे यांनी मानले.