रहाटणीत हौदात पडून चिमुकल्याचा मृत्यू

0

पिंपरी : रहाटणी येथील यशवंतनगर येथे बांधकामाच्या हौदामध्ये पडून एका तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. आयुष शंकर पवार (वय 3 रा. सज्जनगड कॉलनी, यशवंतनगर, रहाटणी) असे मयत मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयुषच्या घऱासमोरच एका इमारतीचे काम सुरु आहे.

तेथे बांधकामासाठी म्हणून साठवूण ठेवलेल्या पाण्यात खेळता-खेळता आयुष पडला. सुमारे तासाभराने हा प्रकार उघकीस आला. त्याला उपचारासाठी पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. गेल्या आठ दिवसात मुले बुडण्याची ही तिसरी घटना आहे. यामध्ये दिघी येथे 19 नोव्हेंबर रोजी खेळत-खेळत सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाचा बालक मरण पावला. तर शनिवारी पुण्यातही बांधकामाच्या साईटवर साठवलेल्या पाण्यात पडून अडिच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.