रहाटणी पिंपळे सौदागर स्मार्ट सिटीसाठी 344 कोटींची मंजूरी

0

पिंपळे सौदागर- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नातून रहाटणी पिंपळे सौदागर स्मार्ट सिटीसाठी 344 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात यश आले आहे. पिंपळे सौदागरयेथे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यावतीने स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे सादरीकरण हॉटेल गोविंद गार्डन येथे करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्दीकर यांनी स्मार्ट सिटी काय आहे ती कशी असणार आहे याचे तब्बल दीड तास व्हिडिओ क्लिपद्वारे सादरीकरण केले होते आणि स्मार्ट सिटी संदर्भात नागरिकांशीसंवाद साधला होता.

लवकरच कामाला सुरुवात
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी रहाटणी पिंपळे सौदागर येथे केलेली आणि काही करण्यात येणारे स्मार्ट प्रोजेक्ट छत्रपती शिवाजी महाराज लिनीअर अर्बन गार्डन, पेडल सायकल, वाहतुकीला आळा घालण्यासाठी भुयारी मार्ग,उड्डाणपूल, रहाटणी सौदागर येथील नागरिकांच्या स्वास्थची काळजी घेत कै.बाळासाहेब कुंजीर प्ले-ग्राऊंड येथे ओपन जिम उभारण्यात आली आहे, तसेच फुटबॉल ग्राऊ ंड, टेनिस कोर्ट, स्केटिंग ग्राऊंडचा आराखडा तयार करून लवकरच या कामांना सुरु करण्यात येणार आहे.

आमदारांचे सहकार्य
कुणाल आयकॉन रोड येथील दोन लाख स्केअर मध्ये उभारण्यात आलेले राजमाता जिजाऊ उद्यान,हॉकर्स झोन,रहाटणी सौदागरच्या पिण्याच्या पाणी सारखा गंभीर प्रश्‍न मार्गी लावुन 80 लाख लिटर पिण्याच्या पाणीच्या टाकीचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करुन तोही प्रश्‍न मार्गी लावण्यात आला. प्रथमच चालु करण्यात येणारे इ-स्कूटर सेवा,पार्किंग झोन 1 आणि 2, सौदागर येथील शंकर मंदिरा समोरील मोकळ्या जागेत बस डेपो आणि ऍडीटोरियम हॉल,सिनिअर सिटीजनसाठी विरंगुळा केंद्र, काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली तेजस्विनी बस सेवा असे बरेच स्मार्ट प्रोजेक्ट आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शत्रुघ्नकाटे आणि नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आहे.