रहिमपुरे येथे विजेच्या तार तुटल्याने भीषण आग

0
शिंदखेडा । शिंदखेडा तालुक्यातील रहिमपुरे येथे विजेच्या तार तुटल्याने भीषण आग लागली होती. गावाच्या वीजपुरवठा बंद करण्यात आला. गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावाबाहेर मेन लाईन चा तार अचानक तुटल्याने त्याठिकाणी कोरडे झालेले झाडझुडपेना आगने पेठ घेतला. तार पुर्णपणे विळगुन गेला होता. त्वरीत डिपीवरून लाईट बंद करण्यात आले. तार तुटल्याने भीषण आगेने पेठ घेतला आजुबाजुला गावकऱ्यांचे खळे असल्याने एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तार तुटून खाली पडल्याने आगेने पेठ घेण्यास सुरूवात झाली होती. गावातील ग्रामस्थांनी धाव घेतली सबस्टेशन संपर्क करून लाईट बंद करण्यात आले. मात्र, कोणतीही जावीत हाणी झाली नाही. भीषण आगीने पेठ घेतल्याने गावकऱ्यांची धांदल उडाली होती. लाईट बंद करून आग आटोक्यात आली. सबस्टेशनेत फोन करून आगीची संपूर्ण माहिती देण्यात आली. आग कशामुळे लागली हे समजले नाही. आग लागली त्याठिकाणी घरे, गुरांचे गोठे,गावकऱ्यांचे खळ्यात गुरांचे चारादेखील होते सुदैवाने टाळले . झाडे झुडपे आगीने पेठ घेताना चित्र दिसल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. तार तुटल्याने ग्रामस्थ झोपेतून उठून पहायला मोठी गर्दी झाली होती. भीषण आग पाहता आरडाओरडा केली हि घटना रात्री 11 च्या सुमारास झाली होती. बाम्हणे उपकेंद्रावरून वीजपुरवठा खंडित करून भीषण आग आटोक्यात आणण्यात यश आले. भीषण आगीचा तांडव झाला होता. त्या घटण्यासंदर्भात बाम्हणे सबस्टेशनात माहिती देण्यात आली होती. गावाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दिवसभर शेतात काम करणारे शेतकरी भीषण आगीचा तांडव पाहिल्याने झोपच उडाली होती. तार तुटून 3-4 तुकडे झाले होते. ज्या ठिकाण तार तुटले तिथे दिवसा ग्रामस्थ ये-जा करतात सुदैवाने हि घटना रात्री घडल्याने अनार्थ टळला .