जळगाव । रोहित्रात बिघाड झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून जिजाऊ नगरातील रहिवाशांना अंधारात रात्र काढावी लागली. तीव्र उन्हाळा असल्याने जीवाचा लाही लाही होत असतांना त्यातच विज गायब झाल्याने संतप्त जिजाऊ नगर रहिवाश्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी 17 रोजी पुन्हा वाघनगर सबस्टेशनवर सक धडक मोर्चा काढला़ तब्बल तीन ते साडेतीन तास रहिवाश्यांनी सबस्टेशनवर ठिय्या मांडत कार्यकारी अभियंता जयंत लढे यांना धारेवर धरले. त्यानंतर दुपारी 11़30 वाजता नवीन रोहित्र मागवून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली़ मात्र, तीन दिवस वीजच नसल्याने घरात पिण्यासाठी पाणी सुध्दा नसल्याने महावितरणाच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
रात्री काढला मोर्चा
वीज वितरण कंपनीच्या या भोगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना उमटत आहे. वीजबिले भरमसाठ येते असल्याने सामान्य ग्राहकांना अधिभार सोसावे लागत आहे. असे असतांना नियमित विज पुरवठा होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. गेल्या शनिवारी रात्री सावखेडा शिवारातील जिजाऊ नगरातील एका डिपीवरील रोहित्रात बिघाड झाल्याने संपूर्ण परिसराची वीज पुरवठा खंडीत झाला़ दुसर्या दिवशी रविवारी दिवभर वीज न आल्याने संतप्त रहिवाश्यांनी रात्री 11 वाजता वाघनगर सबस्टेशनवर मोर्चा काढला. त्यानंतर अधिकार्यांनी हालचाली सुरू करत दुसरे रोहित्र बसवून वीज पुरवठा सुरळीत केला होता.
पाणीटंचाईचा सामना
महावितरण अधिकारी व कर्मचार्यांना संपर्क साधून सुध्दा कुणीही प्रतिसाद देत नसल्याने अंधारात असलेल्या जिजाऊ नगरवासियांनी थेट सोमवारी रात्री 1 वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला. परंतू, जिल्हाधिकारी यांची भेट न झाले नाही. वीजच नसल्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.
अभियंत्याला धरले धारेवर
रात्री एक रोहित्र दुरूस्त करताच दोन तासानंतरच गुरूदत्त मंदिराजवळील रोहित्र जळाल्याने जिजाऊनगर रहिवासी पुन्हा अंधारात होते. मात्र, एक दिवस उलटून देखील एकही अधिकारी व कर्मचारी दुरूस्तीसाठी येत नसल्याचे पाहून रहिवाश्यांचा तापमानाचा पारा चढला. त्यामुळे त्यांनी वाघनगर बसस्टेशन गाठले. कार्यकारी अभियंता जयंत लढे यांनी संपप्त मोर्चेकरांची समजूत घातली.