भुसावळ। तालुक्यातील शिवपूर-कन्हाळे बु.॥ येथे रहिवासी वस्तीत बेकायदा दारू दुकान सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांसह महिलावर्गातून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांची परवानगी न घेता हे दुकान थाटण्यात आल्याने भुसावळातील जनआधार विकास पार्टीने आक्रमक पवित्रा घेत हे दुकान बंद पाडण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.
प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आले. संबंधित विभागाने तातडीने दुकान बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर जयसिंग इंगळे, प्रकाश इंगळे, निर्मलाबाई इंगळे, कैलास चौधरी यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदन देताना जनआधार विकास पार्टीचे रवींद्र सपकाळे, विक्रम वानखेडेख, गजानन निंबाळकर आदींची उपस्थिती होती.