रांगोळीतून घडवले भक्तीचे दर्शन

भुसावळ : मंगळवारी महाशिवरात्री असल्याने सर्वत्र शिव शंकराचा जागर करण्यात आला. महाशिवरात्रीचे औचित्य साधून महादेव, नीलकंठ शिव तसेच शिवभक्त (मानव, दानव, असूर) दर्शन भुसावळातील हर्षानंद निंबा सोनवणे यांनी सहा बाय आठ आकाराची रांगोळी काढून घडवले. ही रांगोळी पाहण्यासाठी भुसावळकरांची मोठी गर्दी उसळली होती.