रांगोळी स्पर्धेंद्वारा समाज जागृतीचे काय

0

नवापूर। जागतिक महिला दिनानिमित्त क्षत्रिय राणा राजपूत समाज महिला संघातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर रांगोळी स्पर्धेत समाजातील मोठ्या प्रमाणात महिला व मुलींनी सहभाग घेतला. स्त्री-भ्रूण हत्या,स्त्री शक्तीचा गजर व विविध सुबक प्रकारच्या रांगोळ्या काढून समाज जागृतीचा संदेश देण्यात आला. रांगोळी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वाय.आर.पाटील व एम.एम.पाटील उपस्थित होते.

स्पर्धेत प्रथम जया मनोज पाटील,द्वितीय अक्षदा प्रशांत पाटील व तृतीय भटी कौशिक पाटील यांना महिला संघामार्फत भेट वस्तू व महाराणा प्रताप युवा सेनेचे अध्यक्ष- प्रशांत(छोटुभाऊ) पाटील यांच्या तर्फे महाराणा प्रताप यांची प्रतिमा व रोख रक्कम देण्यात आली.यशस्वीतेसाठी महिला संघाच्या अध्यक्षा शिला पाटील, उपाध्यक्षा सारिका पाटील व सचिव-डॉ.योगिता पाटील तसेच महिला संघाच्या कार्यकर्त्यांनी कामकाज पाहिले. यावेळी क्षत्रिय राणा राजपूत समाज,नवापूर व महाराणा प्रताप युवा सेना, नवापूर यांचे सहकार्य लाभले.