रांचीत तिसर्‍या कसोटी सामन्याला सामोरा जाणार!

0

रांची । भारत व कांगारूच्या झालेल्या प्रत्येक क्रिकेट मालिकेत वादाची चिनगी पडते. कोव्हा शाब्दीक चकमक, कधी मैदानाबाहेर खेळाडूंच्या वादग्रस्त प्रतिक्रिया यावरून भारत विरूध्द कांगारू याच्या मालिका गाजल्या आहेत. बंगळुरू कसोटीत देखील डीआरएस प्रणालीवरून कांगारूचा कर्णधार स्टीव स्मिथ आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांचा वाद पुढे आला. डीआरएसच्या निर्णयासाठी स्मिथने ड्रेसिंग रुमकडे मदतीसाठीचा केलेला प्रयत्न आणि कोहलीने भर मैदानात स्मिथला सुनावलेले खडेबोल यावरून बंगळुरू कसोटी चांगली गाजली. यावरून दोन्ही संघामध्ये तणाव आहे. मात्र भारताचा कर्णधार विराटला या वादावरून आता पुढे जाण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. स्मिथसोबत झालेल्या शाब्दीक लढाईबद्दल अजिबात खंत वाटत नसल्याचे विराट म्हणाला.

मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली
रांची कसोटीच्या पूर्वसंध्येला कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. कोहली म्हणाला की, मी जे काही बोललो त्याची मला अजिबात खंत वाटत नाही. पण एकच गोष्टी सारखी गिरवत बसण्यात काहीच अर्थ नाही. आम्हाला आता पुढे जायला हवे. याआधीही अनेक गोष्टी उगाच ताणून धरण्यात आल्या, पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे झाले गेले विसरून पुढे जाणेच योग्य आहे.रांचीत भारतीय संघ गुरूवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱया कसोटी सामन्याला सामोरा जाणार आहे.

पुण्यातील कसोटी गमावल्यानंतर बंगळुरू कसोटीत पुनरागमन करत भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे मालिकेत आघाडी घेण्यासाठी रांची कसोटी दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर आम्ही लक्ष केंद्रीत करत नाही. आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी कशी सर्वोत्तम राहिल यासाठीच्या प्रयत्नांवर आमचा भर राहिल, असेही विराट पुढे म्हणाला.