रांचीत पाच गोलंदाज असते तर वेगळा निकाल असता

0

रांची । भारताला रांचीची तिसरी कसोटी जिकता आली असता.कारण ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावाला प्रारंभ झाला तेव्हा 23 धावांवर 2 फलंदाज तंबूत परत गेले होते. पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कसोटीचा पाचवा दिवस खेळून काढला आणि कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. रांची कसोटीत भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळला असता तर विजय प्राप्त करता आला असता.मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीवर कायम आहेत. धर्मशाला येथे होणारी अखेरची कसोटी निर्णायक ठरणार आहे. तिसरी कसोटीत वृध्दीमान साह,अश्विन आणि जडेजा यांनी चांगली खेळी करत आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे अतिरिक्त फलंदाजाची गरज नव्हती. भारताने संघात आणखी एका गोलंदाजाचा समावेश केला असता तर कसोटीचा निर्णय भारताच्या बाजूने असता, असे गावस्कर म्हणाले. असे मत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय संघ सर्वश्रेष्ठ संघ आहे.या संघात कोणतीच कमतरता नाही आहे. पहिल्या व दुसर्‍या फळीतील फलंदाज गारद झाले तरी अश्विन,साहा व जडेजा चांगली फलंदाजी करू शकतात. जडेजाने या मालिकेत आपल्या गोलंदाजीसोबत फलंदाजीनेही त्याने स्वत:ला सिध्द केले आहे. कोहलीने पाचव्या गोलंदाजाला संघात घेऊन खेळायला हवे होते. पाच गोलंदाज आणि सहा फलंदाजांसोबत कोहलीने मैदानात उतरायला हवे होते. वेगवान गोलंदाजीची धुरा इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यावर होती. दोघांनीही चांगली गोलंदाजी केली. पण आणखी एक गोलंदाज संघात असता तर इतर गोलंदाजांना थोडा आराम मिळाला असता आणि गोलंदाजीत नाविण्यही आजमावून पाहता आले असते.पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज स्वस्तात तंबूत दाखल झाल्यानंतर शॉन मार्श आणि पीटर हेण्ड्सकोम्ब यांनी पाचव्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी रचून पराभव टाळला. पाचव्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स गमावून 53 धावांची आघाडी घेतली होती. सामन्याचा निर्धारित कालावधी संपुष्टात आल्याने कसोटी अनिर्णीत राहिल्याचे पंचांना घोषित करावे लागले.