रांची । भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या बोर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीच्या मालिकेची तिसरी कसोटी 16 मार्चपासून रांचीमध्ये खेळवली जाणार आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममधला हा पहिलाच कसोटी सामना ठरणार आहे.मात्र या सामन्याला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा रांची कसोटीला उपस्थित राहू शकले की नाही याविषयी झारखंड क्रिकेटच्या पदाधिकार्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.साहजिकच, रांचीचा पुत्र धोनी आपल्या घरच्या मैदानातली पहिली कसोटी पाहण्यासाठी उत्सुक आहे. गुरुवारीही धोनीने रांचीच्या स्टेडियमला भेट दिली होती. त्यानंतर 15 मार्चला होणार्या विजय हजारे करंडकाच्या उपांत्यपूर्व लढतीसाठी धोनी झारखंडच्या संघासोबत दिल्लीला रवाना झाला.झारखंडने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तर धोनीला कदाचित रांची कसोटीला हजेरी लावता येणार नाही.