रांजणगावात पती,पत्नीला मारहाण; एकावर गुन्हा

0

चाळीसगाव । बापू आधार पाटील (४५, रा. रांजणगाव) यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आरोपी समाधान आबा पाटील (रा. रांजणगाव) यांने शेतीच्या वादाची मागील कुरापत काढून त्यांची पत्नीस शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ का करतो? अशी विचारणा केल्याचा राग येवून आरोपी समाधान पाटील यांने त्यांच्या खांद्यावर, डोक्यावर पावडी मारून दुखापत केली. त्यावेळी त्यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी गेली असता त्यांना देखील चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात फिर्यादी यांनी वैद्यकिय दाखला दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.