रांजणगावात मिरवणूक

0

रांजणगाव । सावतामाळी महाराज यांच्या 722 व्या पुण्यतिथीनिमित्त रांजणगाव येथील सावतामाळी तरुण मंडळ, सावतामाळी भजनी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून खेडकर वस्तीपासून महागणपती मंदिरापर्यंत टाळ, मृदंगाच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच हरिनाम सप्ताहानिमित्त जागर, हरिपाठ, कीर्तन, भजन, अन्नदान आदींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, माजी आदर्श सरपंच भिमाजी खेडकर, ग्रामपंचायत सदस्य संपत खेडकर, प्रा. माणिक खेडकर, भाऊसाहेब विष्णू खेडकर, रोहिदास खेडकर, अरुण भुजबळ, पंढरीनाथ खेडकर, हभप विलास महाराज खेडकर आदी उपस्थित होते.