‘राइस एन शाइन बायोटेक’ कंपनीला भीषण आग

0

पुणे : आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील राइस एन शाइन बायोटेक कंपनीला भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी ७ ते ८ अग्निशमन दलाचे बंबांना पाचारण करण्यात आले आहे. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील हे आपल्या पोलीस पथकासह दाखल झाले.