राईनपाडा घटनेचा निषेध : भारीप बहुजन महासंघाचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

0

भुसावळात प्रचंड घोषणाबाजी : दोषींना फाशी देण्यासह मयतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी

भुसावळ- धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले पळवण्याच्या संशयातून नाथपंथी डवरी समाजातील पाच भिक्षुकांची हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेचा भारीप बहुजन संघाच्या पदाधिकार्‍यांनी निषेध केला असून शुक्रवारी प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या घटनेतील दोषींना तातडीने अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी तसेच मयताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपये भरपाई द्यावी, त्यांच्या परीवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे तसेच अफवा पसरणार्‍यांवर कायदेशीर बंदोबस्त करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देताना भारीपाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, उपाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा संघटक प्रवीण आखाडे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.मनोहर सपकाळे, शहराध्यक्ष गणेश इंगळे, युवा भुसावळ शहराध्यक्ष विद्यासागर खरात, रेल्वे उत्तर वॉर्ड अध्यक्ष रूपेश सांळुखे, संदीप मोरे, संजय सुरडकर, तालुका संघटक बबन कांबळे, विशाल घायदडक, तुषार जाधव, प्रमोद गायकवाड, नीलेश जाधव, विशाल अवसरमल, दिनेश नरवाडे, शरद दाभाडे, जितेंद्र नामदास, स्वप्नील इंगळे, विद्यानंद जोगदंड, आकाश वानखेडे, विशाल सपकाळे, भीमा इंगळे, शेख समीर यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.